Maharashtra Live Updates 31th May 2023 : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

केंद्र सरकारकडून 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द; आणखी 150 वैद्यकीय महाविद्यालयांवर टांगती तलवार

Recognition of 40 Medical Colleges Canceled: मोदी सरकारनं (Modi Government) देशातील 40 वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता रद्द केली आहे. यासोबतच केंद्र सरकारनं (Central Government) 150 वैद्यकीय महाविद्यालयं निगराणीखाली ठेवली आहेत, याचाच अर्थ असा की, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान या महाविद्यालयांमध्ये तसेच, तेथील व्यवस्थेत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्यानं सरकारनं ही पावलं उचलली आहेत. नॅशनल मेडिकल कमिशनच्या यूजी बोर्डानं ही तपासणी केली होती, त्यानंतर या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या महाविद्यालयांची मान्यता रद्द?

केंद्र सरकारनं ज्या 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द केली. ती गुजरात, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील आहेत. तसेच, उर्वरित दीडशे वैद्यकीय महाविद्यालयांची चौकशी अजुनही सुरूच आहे. चौकशीदरम्यान या महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आल्यास त्यांची मान्यताही रद्द करण्यात येईल, असं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

<a href="https://ift.tt/YE1GpW2 News : लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू, सजनपुरी परिसरात तणाव, दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

<a href="https://ift.tt/rJz5Tha News : बुलढाणा (<a href="https://ift.tt/7Afd6yN) जिल्ह्याच्या खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा (Autorickshaw) घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी आहे. या घटनेनंतर सजनपुरी (Sajanpuri) परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. परिणामी परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे.

नेमकं काय घडलं?

खामगावातील सजनपुरी परिसरात मंगळवारी (30 मे) रात्रीच्या लग्न सोहळा पार पडत होता. रात्री नऊच्या सुमारास लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटोरिक्षा घुसली. या घटनेत दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एक पुरुष गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्रथम उपचार केले. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्याला अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु रुग्णालयात नेत असतानाच रामू सावरकर या इसमाचा वाटेत मृत्यू झाला. यामुळे सजनपुरी परिसरात रात्री तणाव निर्माण झाला होता.

परिसरात दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त

ऑटोरिक्षा चालक विशिष्ट समाजाचा असल्याने आणि जखमी वऱ्हाड्याचा मृत्यू झाल्याने सजनपुरी परिसरात तणाव निर्माण झाला. यानंतर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. या परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-live-updates-31th-may-2023-today-maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-news-national-politics-news-maharashtra-live-updates-31-may-2023-1180301

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.