Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बनलाय महाराष्ट्राचा स्माईल अॅम्बॅसेडर

<p>मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बनलाय महाराष्ट्राचा स्माईल अॅम्बॅसेडर. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या स्वच्छ मुख अभियानासाठी सचिनची स्माईल अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. तंबाखू सेवनामुळं होणाऱ्या तोंडांच्या कर्करोगाचं प्रमाण राज्यात वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं तंबाखू सेवनाच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं स्वच्छ मुख अभियान राबवण्यात येत आहे. त्या अभियानासाठी सचिन तेंडुलकरसोबत आज सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत झालेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानासाठी सचिन तेंडुलकरनं निःशुल्क राजदूत होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. आजचा दिवस पाहून माझे वडील नक्की खूश झाले असते, असे उद्गार सचिन तेंडुलकरनं आपल्या भाषणात काढले. त्याचं कारण काय, हे जाणून घेऊयात दस्तुरखुद्द सचिनकडूनच.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sachin-tendulkar-has-become-the-smile-ambassador-of-maharashtra-1180290

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.