27th June Headlines: आज पवसच जर वढणर कसआर पडरगच दरशन घणर; आज दवसभरत

27th June Headlines: राज्यात आता मान्सूनला दमदार सुरूवात झाली असून येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,

केसीआर आज पांडूरंगाचे दर्शन घेणार

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. केसीआर आपल्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह काल सोलापुरात आले आहेत. त्यांच्यासोबत 600 गाड्यांचा ताफा आहे. आज केसीआर यांनाच व्हीआयपी दर्शन देण्यात येणार असून त्यांच्या इतर सहकाऱ्यांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. केसीआप 9.30 वाजता विठ्ठलाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते वारकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

सकाळी 10.30 वाजता केसीआर सरकोलीत जाणार असून त्याठिकाणी भागिरथ भालके यांचा पक्षप्रवेस होणार आहे. त्यानंतर दुपारे ते तुळजापूरला जाणार असून तुळजाभवानीचे दर्शनही ते घेणार आहेत. संध्याकाळी 4.30 वाजता ते हैदराबादला रवाणा होतील.

आज मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार

आज मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार असून पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने 27 आणि 28 जून साठी विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात मान्सून गतिमान होऊन विदर्भात शेतीच्या कामांनाही गती मिळण्याची शक्यता आहे.

जळगावात शासन आपल्या दारी कार्यक्रम

शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जळगाव तेथे येणार आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा खडसे यांनी दिला आहे.

आज मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदिल दाखवण्यात येणार

ओडिसा ट्रेन अपघातामुळे मडगाव-मुंबई वंदे भारत ट्रेनचा शुभांरभ पुढे ढकला होता. आज वंदे भारतला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. 28 जूनपासून नियमित सेवा सुरू होईल. ही ट्रेन सीएसएमटी येथून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे 5:25 वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या दिशेने मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी 12:20 वाजता मडगावहून सुटेल आणि 10:25 वाजता सीएसएमटी पोहोचेल. पावसाळ्यानंतर म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावेल. मुंबईहून सकाळी 5.25 वाजता सुटेल आणि दुपारी 1.10 वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या दिशेने मडगावहून दुपारी 2.40 वाजता सुटेल आणि रात्री 10.25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे थांबे असतील.

पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज  पालखी भंडीशेगाववरून निघाल्यावर दुपारी बाजीरावची विहिर येथे चौथे गोल रिंगण आणि दुसरे उभे रिंगण पार पडेल. माउलींच्या पालखीचा पंढरपूरपूर्वी शेवटचा मुक्काम आज वाखरी येथे असेल. परवा माउली पांडुरंगाच्या नगरीत पोहोचतील.

संत तुकाराम महाराज पालखी आज पिराची कुडोली येथून  निघाल्यावर दुपारी बाजीराव विहिर येथे  दुसरे उभे रिंगण पार पडेल. त्यानंतर पालखी वाखरी मुक्कामी असेल. तुकोबारायांचाही हा पंढरपूर येण्याआधी शेवटचा मुक्काम असेल.

भोपाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राणी कमलापति रेल्वे स्टेशनवर पाच वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

कोर्टातील सुनावणी

संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या सुनावणी. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय आणि प्रवीण राऊत यांना सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे.

हसन मुश्रीफांची तिन्ही मुलं साजिद, आबिद आणि नाविद यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी. तिघांना अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपत आहे.

गँगस्टर छोटा राजननं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सीरीज 'स्कूप'विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, त्यावर आज सुनावणी होईल. याच सर्वांची नावं बदलली, शिक्षा झालेल्या इतर आरोपींचीही नावं बदललीत मग केवळ माझंच खरं नाव का कायम ठेवलं?, असा सवाल उपस्थित करत छोटा राजननं आपली प्रतिमा यातून मलिन होत असल्याचा दावा याचिकेतून केलाय.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/27th-june-headlines-rain-will-increase-today-kcr-in-pandharpur-ashadhi-wari-today-s-headlines-1187541

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.