<p>आता इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या वर्गांमधल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी पाचवी आणि वार्षिक परिक्षेत उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या वर्गांच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. पण पुनर्परीक्षेतही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढच्या वर्षात पाचवी आणि आठवी इयत्तेच्या वर्गातच बसावं लागणार आहे. राज्य शालेय शिक्षण विभागानं हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागानं शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा केली आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-it-is-mandatory-to-pass-the-fifth-and-annual-examination-to-get-admission-in-the-next-class-1186741
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-it-is-mandatory-to-pass-the-fifth-and-annual-examination-to-get-admission-in-the-next-class-1186741
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: