Jagannath Puri Rath Yatra 2023 :  जगन्नाथ पुरीची ऐतिहासिक रथयात्रा आजपासून सुरु होत आहे. भारतातील कोट्यवधी भाविकांसाठी ही यात्रा श्रद्धेचे स्थान आहे. याच ऐतिहासिक रथयात्रेचं महाराष्ट्र कनेक्शनही आहे. मराठा साम्राज्याचा भाग असलेल्या नागपूरच्या भोसले राजघराण्याचा जगन्नाथ पुरी मंदिराशी आणि तिथल्या रथयात्रेशी खास संबंध राहिला आहे. ओडिशामधील पुरी येथील जगन्नाथ मंदिरातून ऐतिहासिक रथयात्रा निघते. यामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांचे रथ हाताने ओढतात. मात्र या रथयात्रेचे महाराष्ट्राची एक आगळे वेगळे संबंध आहे....

भोसले राजघराण्याचे प्रथम रघुजीराजे भोसले यांनी 1751 मध्ये मोगलांसाठी बंगाल आणि ओडिशा नियंत्रित करणाऱ्या तत्कालीन नवाब अलीवर्दी खानचा पराभव केला होता. अलीवर्दी खान याला पराभूत केल्यानंतर जेव्हा रघुजी राजे ओडिशाला पोहोचले, तेव्हा मुस्लिम सत्ताधार्यांनी पुरीच्या मंदिराची काय दुरावस्था केली आहे, हे त्यांच्या लक्षात आले. रघुजी राजे भोसले यांनी पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्याकाळी चाळीस लाख रुपये खर्च करत अन्नछत्र, भोज कक्ष, 22 पेक्षा जास्त धर्मशाळा यांचे निर्माण केले होते. एवढेच नाही तर मंदिराला हजारो एकर जमीन देऊन आर्थिक दृष्ट्या मंदिर स्वतःच्या पायावर उभे राहील अशी व्यवस्था केली होती.

रघुजीराजे भोसले यांच्या संरक्षणात मुस्लिम आक्रमणामुळे काही काळ बंद पडलेली जगन्नाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली होती. रघुजी राजेंनी दरवर्षीच्या यात्रेसाठी प्रति वर्ष वीस हजार रुपये खर्चही देऊ केला होता. तेव्हापासूनच स्थानिक गरिबांना सातत्याने काम मिळावं या उद्दिष्टाने प्रत्येक वर्षाच्या यात्रेसाठी नवीन रथ निर्माण करण्याची परंपरा सुरू झाल्याचे बोलले जाते. जगन्नाथ पुरी मंदिराच्या समोर उभा असलेलं अरुण स्तंभ ज्याला अनेक लोक गरुड स्तंभही म्हणतात.. तो स्तंभ मराठ्यांनीच स्थापन केलं आहे. त्याकाळी हे अरुण स्तंभ मंदिर लुटण्याच्या उद्दिष्टाने येणाऱ्या हल्लेखोरांना इशारा देण्यासाठी होते. या पलीकडे पाऊल ठेवल्यास गाठ मराठ्यांची आहे, असा त्याचा त्याकाळचा अर्थ होता.

पुरीमध्ये कायम असलेली मोहन भोगची प्रथा ही मराठ्यांनी सुरू केल्याचे इतिहासात नोंद आहे. भोसले राजांनीच पुढील काळात पुरीला देशातील इतर भागांशी जोडणारे महत्त्वाचे रस्ते बांधले. पुरी शहराकडे येणारे अनेक पूल बांधले आणि त्यामुळेच पुरीची जगन्नाथ यात्रा देशभरातील भाविकांना आकर्षित करू लागली. भोसले राजांनीच जगन्नाथ पुरीसह ओडिशाच्या मोठ्या भागात प्रशासनिक व्यवस्था निर्माण केली. अनेक धर्मशाळा विहीर बांधल्या. शेतीची सुधारणा करत कर रचना निर्माण केली जमिनीचे रेकॉर्ड तयार केले.

source https://marathi.abplive.com/news/nagpur/jagannath-puri-rath-yatra-2023-maharashtra-nagpur-connection-celebrating-lord-krishna-balbhadra-and-subhadra-1185605
source https://marathi.abplive.com/news/nagpur/jagannath-puri-rath-yatra-2023-maharashtra-nagpur-connection-celebrating-lord-krishna-balbhadra-and-subhadra-1185605
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: