Maharashtra Board 10th Result: दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली असून आज महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी 11 वाजता महाराष्ट्र बोर्डाकडून पत्रकार परिषद घेतण्यात येईल आणि दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यंदा तुम्ही अगदी काही सेकंदात निकाल पाहू शकता. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्याची सुविधा आहे. <a href="https://ift.tt/o36l0t7> या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. 
Maharashtra SSC Result 2023 : कुठे पाहता येणार निकाल?
महाराष्ट्र बोर्डानं निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो ABP Majha वरही पाहता येणार आहे. त्यासाठी MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करावं लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोडही करता येणार आहे. 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 79 हजार 374 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 नं कमी झाली आहे. 
Maharashtra SSC Result 2023 : एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा 
स्टेप 1 : सर्वात आधी एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉन ऑन करा.
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
स्टेप 4 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या : 
<a href="https://ift.tt/gKZ09bS Result : दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता, 'एबीपी माझा'च्या एका क्लिकवर डाऊनलोड करा गुणपत्रिका 
source https://marathi.abplive.com/education/maharashtra-board-10th-ssc-result-2023-today-at-abp-majha-know-all-details-mh10-abpmajha-com-1180856
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: