ShahajiBapu Patil On ajit pawar:  'महाविकास आघाडीच्या काळात अजितदादा (Ajit Pawar) रागातून आणि निराशेतून उपमुख्यमंत्री होते पण आता त्यांनी आवडीने हे पद स्वीकारलं आहे', असं म्हणत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे. 'त्यांच्या आवडीने ते भाजप आणि शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत', असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार हे रागातून आणि निराशेतून उपमुख्यमंत्री झाल्याचा खुलासा देखील शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केला आहे.

अजित पवारांच्या येण्यामुळे सरकार अजून गतीमान झाल्याचा विश्वास देखील शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आता तीनही पक्षांच्या आमदारांना सांभाळायाची जबाबदारी आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांची आहे.' तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत किमान 47 आणि विधानसभेत 225 जागा जिंकणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.

'दादांना जर सुप्रियाताईंबद्दल माया जागी झाली तर...'

अजित पवारांना सुप्रियाताईंविषयी माया जागी झाली तर विरोधकांना एक जागा मिळले अन्यथा लोकसभेच्या सर्व जागा महायुती जिंकेल असाही दावा शहाजीबापूंनी केला आहे. तसेच अजित पवारांनी सांगोल्याला निधी देताना कोणताही अन्याय केला नसला तरी गुवाहाटीला इतर आमदारांच्या भावना मी माध्यमांच्या समोर बोलून दाखवल्या होत्या असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

'आता होणाऱ्या विस्तारात आमदारांची नाराजी संपेल'

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे गटातील दोन ते तीन जेष्ठ आमदारांमध्ये नाराजी असल्याचा खुलासा देखील त्यांनी केला आहे. पण आता होणाऱ्या विस्तारात ती नाराजी संपेल अशीही कबुली शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा अलंकार आहेत आणि त्यांच्याचसारखे गावपातळीवर काम करणारे एकनाथ शिंदे आहेत, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

राऊंतावरही केला घणाघात

संजय राऊत हे अपशकुनी असल्याचं म्हणत त्यांना कोणीही आपल्या पक्षात घेणार नाही असा घणाघात शहाजीबापू पाटलांनी संजय राऊतांवर केला आहे. तसेच ते ज्या पक्षात जातील तो पक्ष फुटतो अशी सगळ्यांची खात्री झाल्याचं म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र पेटवायचे काम करणाऱ्या संजय राऊतांना मतं देऊन निवडून दिलं हे आमचं दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच शिंदे गटाचा कोणताही अपमान दिल्लीत झाला नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा :

मुख्यमंत्री कार्यालयाकडून तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधल्याचे पुरावे द्या; संजय राऊतांच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश

source https://marathi.abplive.com/news/solapur/solapur-maharashtra-shahajibapu-patil-on-ajit-pawar-maharashtra-politics-detail-marathi-news-1192793
source https://marathi.abplive.com/news/solapur/solapur-maharashtra-shahajibapu-patil-on-ajit-pawar-maharashtra-politics-detail-marathi-news-1192793
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: