Dhananjay Munde : अपुऱ्या पावसानं शेतकरी संकटाच्या छायेत, वाढदिवस साजरा करणार नाही : धनंजय मुंडे

Dhananjay Munde : सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागातच पाऊस पडत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटाच्या छायेत आहेत. त्यामुळं आज (15 जुलै) असणारा वाढदिवस साजरा करणार नसल्याची भूमिका राज्याचे नवीन कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी घेतली आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक काढून माहिती दिली आहे.

धनंजय मुंडेंनी नेमकं काय म्हटलंय

माझ्या बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही खरीप हंगामातील पेरणीच्या दृष्टीने समाधानकारक पाऊस झाला नाही. बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसलेला असताना मी माझा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा करणे संयुक्तिक नाही, असे मत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.  राज्याचे नवनिर्वाचित कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (15 जुलै) असलेला त्यांचा वाढदिवस सार्वजनिक रित्या साजरा करणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव माझ्यासोबत

नवनिर्वाचित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये जनतेचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा सदैव माझ्यासोबत आहेत. परंतु पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी- बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवून यावर्षी मी वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा न करत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्याकडील काही खाती काढण्यात आली आहे. मागील आठवडाभरापासून खातेवाटपाबाबत चर्चा सुरु होती. अजित पवार त्यासाठी दिल्लीलाही गेले होते. अखेर गुरुवारी रात्री तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर खातेवापटावर शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

अजित पवार गटाला मिळालेल्या खातेवाटपाची यादी...

अजित पवार, उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन
संजय बनसोडे - क्रीडा
आदिती तटकरे - महिला बालविकास मंत्रालय
हसन मुश्रीफ - वैदकीय शिक्षण
अनिल पाटील - मदत पुनर्वसन
दिलीप वळसे पाटील - सहकार
धनजंय मुंडे - कृषी खाते
छगन भुजबळ - अन्न आणि नागरी पुरवठा
धर्मरावबाबा आत्रम - अन्न व औषध पुरवठा

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/lbqWr0V Cabinet Portfolio : अजित पवारांकडे अर्थ खाते, पाहा कोणाला कोणते खाते मिळाले?

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/farmers-in-trouble-due-to-insufficient-rains-i-will-not-celebrate-birthday-says-agriculture-minister-dhananjay-munde-1192557

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.