Eknath Shinde : मुंबईतील कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना तिसऱ्या इंजिनचा विसर पडल्याचं दिसून आलं. कारण अल्पसंख्यांक समूदायाला संबोधित करताना केलेल्या भाषणावेळी त्यांनी हे डबल इंजिनचे सरकार आहे असं म्हटलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आलं आहे.

'नशिबानं एकदा मिळतं पुन्हा मिळत नाही', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackarey) टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत अल्पसंख्यांकांच्या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे. तसेच 'आम्ही महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहोत, आम्ही महाराष्ट्रांच्या हिताचे निर्णय घेत आहोत' असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आम्ही देणारे, घेणारे नाही - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काँग्रेसवर देखील टीका केली आहे. त्यांनी बोलतांना म्हटलं की, 'काँग्रेसला असं वाटतं की मुस्लिम समाज नेहमी गरीबच राहावा.' ज्यांना द्यायचं आहे त्यांना रखडून न ठेवता द्यावं आणि आमचं देणाऱ्यांचं सरकार आहे घेणाऱ्यांचं नाही असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मुस्लिम हा शिवसेनेपासून दूर राहणार नाही, त्यामुळे काँग्रेस चुकीचा भ्रम पसरवत आहे.'

'आधीचं सरकार घरात बसत होतं आता ते बाहेर पडतयं'

यावेळी उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, 'आधीचं सरकार घरात बसलं होतं,आम्ही त्यांना बाहेर काढलं आहे.' आता काही जणांच्या कंबरेचा पट्टा निघाला आहे तर काही जणांच्या मानेचा पट्टा निघाला. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे आणि ठाकरे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे असं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटलं. युतीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच अल्पसंख्यांकांचा मेळावा होत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांच स्वागत देखील केलं. 'आमचं सरकार छत्रपतींच्या आदर्शावर चालणारं सरकार आहे' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समानेतच्या मुद्द्यावर भाष्य केलं. पुढे बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, 'हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारं सरकार आहे.'

या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकाराने केलेल्या कामांचे देखील कौतुक केले. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा आणि मेट्रोच्या कामांचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला आहे.

हे ही वाचा :

<a href="https://ift.tt/vJXZopO Thackarey: 'लाचारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही', पोहरादेवीतून उद्धव ठाकरे यांचं विरोधकांवर टीकास्त्र

source https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-chief-minister-eknath-shinde-said-double-engine-government-maharashtra-politics-detail-marathi-news-1191093
source https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-chief-minister-eknath-shinde-said-double-engine-government-maharashtra-politics-detail-marathi-news-1191093
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: