Maharashtra Rain : संपूर्ण विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट', वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain : राज्याच्या बहुतांश भागात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होताना दिसत आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर कुठं शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसलाय. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भासह कोकणातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

रायगडसह रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट

आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशाशनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जरी चांगला पाऊस झाला असला तरी काही जिल्ह्यात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे.  दरम्यान, काही भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राज्यातील कोकणसह विर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं. तिथे शेती पिकांना मोठा फटका बसलाय. तसेच चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात देखील चांगला पाऊस झाला आहे.

पालघर जिल्ह्यात  नद्यांना पूर

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी क्षमता ही पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ, देहरजे त्याचप्रमाणे इतर छोट्या मोठ्या नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. तर ह्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील पालघरसह, जव्हार, डहाणू, विक्रमगड, तलासरी या भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. या भागात पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

बीडमध्ये पावसाची प्रतीक्षा

अर्धा पावसाळा संपला तरी देखील बीड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळं जिल्ह्यातील 143 प्रकल्पापैकी 36 प्रकल्प कोरडे पडले असून 63 प्रकल्पातील पाणी जोत्याखाली आले आहे. जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये फक्त 13 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन प्रकल्पांमध्ये म्हणजेच माजलगाव धरणात फक्त 16 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला असून, बिंदुसरा प्रकल्पामध्ये देखील 23 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळं बीड जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी आता मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/u8lZx4G Rain : पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा! भातशेतीसह बागायती शेती आणि घरांचंही नुकसान

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-news-yellow-alert-for-rain-in-vidarbha-konkan-and-some-districts-of-west-maharashtra-1196792

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.