NCP Ajit Pawar:  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज नाशिकपासून दौऱ्याची सुरुवात केली. तर, दुसरीकडे कालपर्यंत पवारांच्या गटात असणाऱ्या आमदाराने आज मुंबईत अजित पवारांच्या गटात प्रवेश केला आहे.

वाई खंडाळ्याचे आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) हे पुन्हा एकदा देवगिरी निवासस्थानी बैठकीसाठी उपस्थित झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी मकरंद पाटील उपस्थित होते. मात्र, त्यानंतर शरद पवार यांच्या कराड दौऱ्यावेळी आपण शरद पवार यांच्यासोबत आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा मकरंद पाटील अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी निवासस्थानी उपस्थित राहिले.

वाई - खंडाळा - महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी मकरंद पाटील यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सोबत जेष्ठ नेते, आमदार रामराजे निंबाळकर हे उपस्थित होते.

मकरंद पाटील यांच्याशी संबंधित अडचणीत असलेल्या दोन साखर कारखान्यांना मदत करण्याची आणि मकरंद पाटील यांना मंत्री करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. मकरंद पाटील हे शरद पवारांच्या कराड दौऱ्यात त्यांच्या सोबत होते. शरद पवारांनी त्यांना स्वतःच्या गाडीत बसवले होते. अजित पवार यांचा शपथविधी पार पडला तेव्हा मकरंद पाटील उपस्थित होते. पक्षातील फुटीनंतर पवारांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी कराडला जाताना शरद पवारांचा ताफा सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच मकरंद पाटील यांनी शरद पवारांचे हार घालून स्वागत केले होते. त्यानंतर पाटील यांना पवारांनी आपल्या कारमध्ये बाजूला बसवले.

येवल्यात मी कोणावर टीका करायला नाही तर माफी मागायला आलोय : शरद पवार

महाराष्ट्रात नाशिक (Nashik) जिल्ह्याने गेली अनेक वर्ष पुरोगामी विचाराला साथ दिली आहे. कोणत्याही जिल्ह्यांनी साथ सोडली नाही, आज मी इथे आलोय तर ते कोणावर टीका करण्यासाठी नाही, आज मी माफी मागण्यासाठी आलो आहे. माझा अंदाज फारसा चुकत नाही, पण इथं माझा अंदाज चुकला. माझ्या विचारावर तुम्ही साथ दिली. पण माझ्या निर्णयामुळे तुम्हाला यातना झाल्या. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की तुम्हा सगळ्यांची माफी मागायची, म्हणून आज इथे आल्याचे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार (Sharad Pawar) यांची येवल्यात (Yeola) जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार बोलत होते.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-politics-set-back-to-sharad-pawar-mla-from-satara-district-makarand-patil-join-ajit-pawar-group-1190890
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-politics-set-back-to-sharad-pawar-mla-from-satara-district-makarand-patil-join-ajit-pawar-group-1190890
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: