Pharmacy Result: 'फार्मसी'च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना 'कॅरी ऑन'चा लाभ; निकाल 50 टक्क्यांहून कमी लागल्याने निर्णय

मुंबई: फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. फार्मसी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांना 'कॅरी ऑन'चा लाभ देत थेट दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याला फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने यासंबंधिचे एक परिपत्रक सोमवारी जारी केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची चिंता आता मिटली आहे.

फार्मसी पदविकेच्या उन्हाळी परीक्षेच्या प्रथम वर्षाचा निकाल अत्यंत कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत होते. या प्रश्नी लक्ष घालून काही तरी सकारात्मक तोडगा काढण्याची विनंती राज्यातील फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. या प्रश्नी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने कार्यवाही करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयाकडे या विषयी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून फार्मसी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांना कॅरी ऑनचा लाभ देत थेट दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याला फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. या निर्णयाचा राज्यातल्या हजारो फार्मसीच्या विद्यार्थ्याना लाभ होणार आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षी फार्मसीच्या प्रवेश प्रक्रीयेला झालेल्या विलंबामुळे शैक्षणिक कालावधी अत्यंत कमी मिळाला होता. फार्मसी पदविका अभ्यासक्रम वार्षिक असून फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडीयाच्या मानकानुसार हा कालावधी किमान 180 दिवसांचा असणे अपेक्षित होते. मात्र गत वर्षी हा कालावधी अवघा तीन ते चार महिने म्हणजे केवळ 100 ते 120 दिवस एवढाच मिळाला होता. याचा थेट परिणाम प्रथम वर्षाच्या निकालावर झाला होता.

फार्मसीच्या पदविकेच्या उन्हाळी परीक्षा 2023 चा निकाल पन्नास टक्याहून कमी लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यावर अतिरिक्त ताण येऊन त्यांच्यात नैराश्य वाढण्याची भीती होती. त्यामुळे या प्रश्नी काही तरी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी फार्मसीच्या सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे साकडे घातले होते. प्रश्नाचे गांभीर्य आणि विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयासोबत पाठपुरावा केला.

अजित पवारांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून सोमवारी, 24 जुलै रोजी फार्मसी पदविकेच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रवेशित असलेल्या आणि प्रथम वर्षाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2023-24 मध्ये द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने तसे परिपत्रक देखील जारी केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार असून विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे.

ही बातमी वाचा:

पुन्हा धोक्याची घंटा! कोरोनानंतर MERS-CoV व्हायरसची भीती, 27 देशांमध्ये प्रसार; या तीन लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/carry-on-benefits-for-first-year-pharmacy-students-maharashtra-technical-education-board-news-1195583
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/carry-on-benefits-for-first-year-pharmacy-students-maharashtra-technical-education-board-news-1195583
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: