<p>वसई विरार नालासोपारा शहरात मागील चार दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे. आजही सकाळपासून वसई विरार क्षेञात पावसाने आपली दमदार इनिंग सुरु ठेवली आहे. सखल भागात पाणी साचलेलं आहे. मागील चार दिवसापासून शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. आजही तिच परिस्थिती आहे. लोकांच्या सोसायटीत, घरात दुकानात पाणी शिरलं आहे. नालासोपारातील सेंट्रल पार्क, आचोले रोड, स्टेशन परिसर, नगिनदास पाडा, गाला नगर, संतोष भुवन, तसेच वसईचा गास सनसिटी रोड, मिठागर वसाहत, डी.जी. नगर, ओम नगर, अग्रवाल नगर, समता नगर, चुळणे तसेच विरारचं बोलींज आगाशी रोड, विवा कॉलेज आजही पाण्याखाली आहे. नागरीकांचे हाल बेहाल झाले आहेत. आज दिवसभर पावसाने आपली इनिंग अशीच सुरु ठेवली तर मग मोठ्या प्रमाणात हानी पोहचू शकते. प्रशासनाकडून अपील करण्यात आली आहे की, आज रविवार आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा बाहेर जाणं टाळा</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-vasai-virar-flood-water-accumulated-in-the-low-lying-areas-of-nalasopara-city-main-roads-of-the-city-were-flooded-1195020
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-vasai-virar-flood-water-accumulated-in-the-low-lying-areas-of-nalasopara-city-main-roads-of-the-city-were-flooded-1195020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: