शरद पवारांच्या विचारामुळे बीड जिल्ह्याच्या मतदारांनी चार आमदारांना निवडून दिलं : रोहित पवार

Rohit Pawar in Beed : राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा शरद पवार बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेतांना पाहायला मिळत आहे. तर, 17 ऑगस्टला शरद पवार (<a href="https://ift.tt/Zx2siQ8 Pawar) कृषिमंत्री तथा अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (<a href="https://ift.tt/iOJMrQg Munde) यांच्या बीडमध्ये सभा घेत आहे. त्यापूर्वीच रोहित पवार (<a href="https://ift.tt/cfRzn4F Pawar) यांनी बीड (<a href="https://ift.tt/Y4scdlK) जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी बोलतांना, बीडमध्ये शरद पवार यांची सभा होणार असून या सभेला फार मोठा प्रतिसाद मिळणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी माध्यमांना दिली आहे. तर, शरद पवारांच्या विचारामुळे बीड जिल्ह्यातील मतदारांनी राष्ट्रवादी पक्षाचे चार आमदारांना निवडून दिल्याचं सुद्धा रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार रविवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी 17 ऑगस्ट रोजी शरद पवार यांची सभा ज्या ठिकाणी होणार आहे, त्या सभा स्थळाची पाहणी केली. शरद पवारांचे विचार टिकवण्यासाठी या सभेला हजारो नागरिकांची गर्दी होणार असल्याचे ते म्हणाले. संघर्षाच्या पाठीशी सर्व जनता उभी असल्याचं रोहित पवार म्हणाले. बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार यांची सभा होत असल्याने धनंजय मुंडे यांच्या विरोधात ही सभा होईल असे बोलले जात आहे. मात्र, यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, कुठलाही जिल्हा हा कोण आहे का? किंवा त्याचा नसतो, कारण या जिल्ह्यातील लोकांनी एका विचार धारेला मतदान केलेलं असतं.

शिंदे गटामध्ये कुजबूज

शिंदे गटामध्ये काही आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, शिंदे गटांमध्ये सध्या कुजबूज सुरू आहे. लवकरच या संदर्भातल्या काही घटना येत्या काळामध्ये घडणार आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये शरद पवार यांच्या विचारांचा विजय होईल असा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

आरोग्यमंत्र्याला राज्यात काय चालू आहे? हेच माहित नाही...

मुंबईचा ठाण्यामध्ये ज्या रुग्णालयामध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला आहे, याच रुग्णालयात काही दिवसापूर्वी पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता.  याचं कारण जेव्हा समोर आला तेव्हा त्या ठिकाणी असलेली व्यवस्था आणि रुग्णांसाठी ज्या सुविधा दिल्या जातात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचा आढळून आलं होतं. त्यामुळे सरकार आता रुग्णांच्या नातेवाईकांना पैशाची मदत करेल. मात्र, अशा घटना घडू नयेत यासाठी कुठल्याही उपाययोजना सरकारकडून केल्या जात नसल्याची टीका देखील रोहित पवार यांनी केली आहे. तर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री असलेल्या नेत्याला देखील महाराष्ट्रात काय चाललं आहे हे देखील कळत नसल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.

राम शिंदेंचे विचार म्हणजे चघळलेलं च्युइंगम

एमआयडीसीच्या प्रश्नावरून रोहित पवार यांनी सभागृह सुरू असताना आंदोलन केले होते. यावर राम शिंदे यांनी जोरदार टीका केली होती. यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की, राम शिंदे यांचे विचार म्हणजे एका चगळलेल्या च्युइंगम प्रमाणे आहेत. राम शिंदे यांनी एमआयडीसीला विरोध केला असून, सामान्य जनतेच्या रोजगाराचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एमआयडीसीच्या संदर्भात राम शिंदे यांना काहीच कळत नसून, आम्ही इतर मार्गाने मतदारसंघामध्ये एमआयडीसी उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या इतर बातम्या :

भाजप नेत्यांची मिमिक्री करणारे आता हर हर मोदी म्हणतायत; संदीप क्षीरसागर यांची धनंजय मुंडेंवर टीका

source https://marathi.abplive.com/news/beed/rohit-pawar-said-sharad-pawar-thinking-beed-district-voter-elected-four-mla-maharashtra-marathi-news-1201015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.