Free Treatment : मोठी बातमी! राज्यात स्वातंत्र्य दिनापासून शासकीय रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार मिळणार, मंत्रिमंडळाचा निर्णय

Free Treatment In Government Hospital : राज्यातील सर्व नागरिकांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना मिळणार असून यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही योजना राज्यात 15 ऑगस्टपासून लागू होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य खात्याशी संबंधित हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 21 च्या अंतर्गत असलेल्या चांगल्या आरोग्यासह जगण्याचा नागरिकांना अधिकार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या रूग्णांना क्वचित प्रसंगी उपचारासाठी तसेच तपासणीसाठी शासन निर्णयानुसार मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

मोफत शस्त्रक्रिया होणार

सर्व उपचार मोफत मिळणार असून या योजनेतंर्गत सर्व शस्त्रक्रियाही सर्व मोफत असणार आहेत. येत्या 15 ऑगस्टपासून ही योजना लागू होणार आहे. हा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. आरोग्य विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या रूग्णालयात मोफत उपचार होणार आहेत.

'या' चाचण्या मोफत होणार

आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या चाचण्यांमध्ये इसीजी, एक्स-रे, सिटी-स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या यांसारख्या चाचण्यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/31CAFqj August Headlines : सोलापुरात शरद पवार-देवेंद्र फडणवीस एकाच स्टेजवर, सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर ट्रॅफिक जॅम; आज दिवसभरात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-cabinet-approve-from-15-august-free-treatment-for-all-in-government-hospitals-marathi-news-1200762
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-cabinet-approve-from-15-august-free-treatment-for-all-in-government-hospitals-marathi-news-1200762
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: