Ganeshotsav 2023 : गणपती मंडपांसाठी रस्ते खणणाऱ्यां परवानगीच का देता? हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला सवाल

Ganeshotsav 2023 :  गणेशोत्सव-नवरात्रोत्सवादरम्यान मंडपांमुळे रस्ते आणि फुटपाथच्या होणाऱ्या नुकसानाची गंभीर दखल घेऊन अशा मंडळांवर महापालिकेनं कठोर कारवाई करावी असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. या मंडळांची ठेवीची रक्कम जप्त करण्यासोबत पुढील वर्षी यांना परवानगीच न देण्याबाबत विचार करावा असे निरीक्षणही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं बुधवारी व्यक्त केलं.

हे सारं कुठेतरी थांबायला हवं, सण उत्सवादरम्यान मंडप उभारून मुंबईतील रस्ते आणि फुटपाथचं नुकसान करणाऱ्या मंडळांवर केवळ दंडात्मक कारवाई न राहता या मंडळांना पुन्हा मंडपांसाठी परवानगी न देण्याचे आदेश महानगरपालिकेला द्यावेत, अशी मागणी करत प्रमेय फाऊंडेशननं गेल्यावर्षी हायकोर्टात जनहित याचिका केली होती. त्याची दखल घेत यंदा अटीं आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांना पुढील वर्षी परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेला घ्यावा. याप्रकरणी, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकाच कारवाई करू शकते. त्यासाठी त्यांनी तक्रारींची वाट न पाहता ही याचिका म्हणजे तक्रारच समजावी असंही हायकोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलं. यासंदर्भात येत्या सहा आठवड्यांत धोरण तयार करा, असे आदेशही हायकोर्टानं पालिकेला देत ही याचिका निकाली काढली.

सण-उत्सवांदरम्यान मंडप उभारण्याची परवानगी घेतली जाते. परंतु, उत्सवानंतर मंडळांकडून पदपथ आणि रस्ते पूर्ववत न केल्यामुळे पादचाऱ्यांना दरवर्षी विनाकारण त्रासाला सामोरं जावं लागतं असेही न्यायालयानं आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे. महापालिकेनं रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम साल 2020 पासून हाती घेतले असून उत्सवांदरम्यान मंडळांकडून मंडप उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात खड्डे खणले जातात. मात्र नंतर ते भरलेही जात नाहीत, त्यामुळे रस्त्यांचे नुकसान होतं. अशा मंडळांवर कारवाई म्हणून परवानगी मागताना त्यांच्या ठेवीच्या रक्कमेसह प्रत्येक खड्ड्यासाठी मंडळांना दोन हजार रुपये दंड ठोठावला जात असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडून कोर्टात करण्यात आला होता.

दरम्यान, मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी 1 ऑगस्ट 2023 पासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे  गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही. गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://ift.tt/SBUXFl8 या संकेतस्थळावर दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

source https://marathi.abplive.com/news/mumbai/take-strong-action-on-ganpati-mandals-who-dig-roads-for-pandols-high-court-ordered-bmc-1197876

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.