Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार

Maharashtra Assembly Monsoon Session : या महिन्याभरात बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. यामध्ये अजित पवारांचं (<a href="https://ift.tt/k83aRMy Pawar) बंड होऊन सरकारमध्ये येणं, नव्या मंत्र्यांना खातेवाटप व होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार न होणं…अशा एक ना अनेक घडामोडींवरुन महाराष्ट्राचं राजकारण चर्चेत राहिलं. पण आता ही सगळी मंडळी पावसाळी अधिवेशनाच्या (<a href="https://ift.tt/V6rfgMq Assembly Session) निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

टोमॅटोचे वाढलेले भाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोविड घोटाळा, रस्ते घोटाळा, महिलांवरचे अत्याचार, अजित पवारांचं बंड, महायुतीतली धुसपूस, महाविकास आघाडीतली पडलेली फूट, अशा एक ना अनेक मुद्द्यांवरुन यंदाचं पावसाळी अधिवेशन गाजणार आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं तेव्हा सभागृहात फक्त गद्दार आणि खोके ऐकायला मिळायचे. यंदा त्याच घोषणा अजित पवारांच्या विरोधात ऐकायला मिळण्याची नाकारता येत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जरी संयमी भूमिका असली तरी काँग्रेस आणि ठाकरे गट मात्र आक्रमक असणार आहेत.

महाविकास आघाडीतील अजितदादा बाजूला झाले आहेत पण विरोधी आपली वज्रमूठ करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत तर सत्ताधारी विरोधकांना चितपट करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांचा धोधो पाऊस पडताना दिसेल.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै 2023 रोजी सुरू होणार आहे.

हे अधिवेशन 4 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल.

या 19 दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे 15 दिवस आहेत.

शनिवार आणि रविवार असे चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत

पंधरा दिवसांच्या या पावसाळी अधिवेशनात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

त्यातले अर्धे दिवस तर आरोप प्रत्यारोपांमुळे सभागृह बंद पाडण्यातच जातील.

यंदाच्या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत विरोधकांची संख्या खूपच कमी असणार आहेयत्यामुळे विधीमंडळातील आसन व्यवस्था लक्षणीय असणार आहे, कारण आधी विरोधात बसणारे अजित दादा अँड टीम सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी-विरोधक कसे बसणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेत राहणार

अडीच वर्ष अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद साभांळताना सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे काम केलं होतं. मात्र आता अजित पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावत विरोधातून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडे आता विरोधी पक्षनेताच नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा देखील मुद्दा या अधिवेशनात चर्चेत राहणार आहे.

पावसाळी अधिवेशन कमी विरोधकांमध्ये पार पडणार आहे. मात्र विरोधकांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरुन कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखलेली आहे. आपल्या पुरवणी मागण्यांबरोबरच सवाल सभागृहात विरोधक उपस्थित करताना पाहायला मिळतील त्यामुळे हे अधिवेशन पावसाळी की वादळी ठरतं हे पुढील काळात पाहणे महत्त्वाचे ठरेल

दरवर्षी अधिवेशन होतं, आरोप प्रत्यारोप होतात अधिवेशन संपताच सगळे आमदार मंत्री घरी जातात पण जनतेच्या प्रश्नाचे काय? कधी हिंदुत्वाचा मुद्दा, कधी मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा तर कधी वंदे मातरम् कर कधी भारतातल्या विविध मुद्द्यांवर खडाजंगी रंगलेली आपण अनेक वेळा पाहली आहे. त्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जनता खूश नाहीय त्यामुळे या अधिवेशनात महाराष्ट्राच्या हिताचे जनतेच्या हिताचे काहीतरी व्हावं ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-assembly-session-live-update-monsoon-session-of-maharashtra-legislature-begins-today-maharashtra-political-crisis-shinde-fadnavis-government-ajit-pawar-opposition-04-august-2023-1198185

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.