<p> राज्यात काही जिल्ह्यांचा अपवाद वगळला तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पाहायला मिळाला. पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याचा अपवाद वगळला तर राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. राज्यात ऑगस्ट महिना हा अधिकाधिक प्रमाणात कोरडा जाण्याचीच शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील दोन महिन्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या दोन महिन्यांमध्ये देशात मान्सून सामान्य राहिल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-below-average-rainfall-is-expected-in-the-state-from-august-to-september-1197291
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-below-average-rainfall-is-expected-in-the-state-from-august-to-september-1197291
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: