Political Mangalagaur : मंगळागौरच्या निमित्ताने अनोखी युती, मिसेस ठाकरे, मिसेस पवारांची फुगडी

<p>Political Mangalagaur : मंगळागौरच्या निमित्ताने अनोखी युती, मिसेस ठाकरे, मिसेस पवारांची फुगडी</p> <p>मराठी संस्कृतीत मंगळागौर साजरी करण्याची श्रावणातली परंपरा फार जुनी आहे. पण केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवा या चित्रपटानं त्या मंगळागौरीच्या परंपरेला नवं ग्लॅमर लाभलं आहे. आणि ही मंगळागौर काही राजकीय कुटुंबातील महिला एकत्र येऊन साजरी करत असतील, तर त्याचं ग्लॅमर आणखी वाढतं. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची नातसून अंकिता निहार ठाकरे यांच्या घरच्या मंगळागौरीसाठी शर्मिला राज ठाकरे, सुनेत्रा अजित पवार, वृषाली श्रीकांत शिंदे आणि उज्ज्वला सुशीलकुमार शिंदे यांनी झिम्माफुगडीचा आनंद लुटला.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sunetra-pawar-sharmila-thackeray-fugadi-video-political-mangalagaur-abp-majha-1204305

Post Comments

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.