Seema Dev Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन, सीमा देव यांचा अल्पपरिचय

<p>मराठी चित्रपटांच्या कृष्णधवल जमान्यात रमेश देव आणि सीमा देव या दाम्पत्याची जोडी खूपच गाजली. त्या दोघांनी मराठीसोबत हिंदी चित्रपटांचा रुपेरी पडदाही गाजवला. सीमा देव यांनी १९५६ साली आलिया भोगासी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केेलं होतं. जगाच्या पाठीवर, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला आणि आनंद या मराठी-हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. सीमा देव यांचं माहेरचं नाव नलिनी सराफ होतं. रमेश देव यांच्यासोबतच्या त्यांच्या प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं. एक जुलै १९६३ रोजी त्या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि त्या नलिनी सराफच्या &nbsp;सीमा देव झाल्या. रमेश देव आणि सीमा देव या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-veteran-actress-seema-dev-passed-away-seema-dev-s-brief-introduction-1204035

Post Comments

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.