Vasai Virar News : चिंता वाढली! बोगस कागदपत्रांद्वारे बनलेल्या इमारतींमध्ये घर घेतलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Vasai Virar News :  शासकीय कार्यालयाचे बनावट शिक्के (Stamps) आणि लेटरहेड (Letterhead) बनवणारी टोळी पोलिसांनी त्याब्यात घेतली आहे. यामध्ये बनावट शिक्के आणि लेटरहेडद्वारे 55 इमारतींनी (Building) बोगस (Duplicate) कागदपत्रे बनवून पालिकेच्या अवैध परवानग्या देखील घेतल्या होत्या. पण ही बातमी कळल्यानंतर सध्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विरार परिसरात घर घेतलेल्यांना बोगस कागदपत्रांद्वारे घर घेतलेल्या लोकांना आता मात्र भीती वाटू लागली आहे. या इमारतींमध्ये घर घेतलेल्या लोकांची परिस्थिती मध्यमवर्गीयच आहे. त्यामुळे अगदी पै नी पै जमा करुन या लोकांनी त्यांच्या स्वप्नातलं घर घेतलं होतं. पण आता बनावट बिल्डरचंही रॅकेट उघडकीस आल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.

बनावट शिक्के आणि लेटरहेड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर वसई विरारमध्ये असंख्य इमारती  बोगसकागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आल्याचं उघकीस आलं आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे बिल्डरने घरांची नोंदणी करुन नागरिकांना ही घरं विकली आहेत. तसेच नागरिकांना ही टोळी या कागदपत्रांच्या आधारावर बँकेतूनही कर्ज घेण्यास मदत करत होती. त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात येत आहे. पण आता या इमारती बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवल्या असल्यामुळे ही घरं आता अवैध ठरणार असल्याची भीती नागरिकांना लागून राहिली आहे.

या इमारतीमध्ये घरं घेतलेली कुटुंब ही सामान्य घरातली आहेत. पैशांची साठवणूक करुन या लोकांनी त्यांच्या हक्काचं घर घेतलं होतं. पण हेच घर आता त्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. तसेच या नागरिकांची फसवणूक झाल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यात येत आहेत. नागरिकांनी अगदी विश्वास ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण केलं होतं. पण त्यांच्या हे स्वप्न आता मातीमोल ठरण्याची भीती त्यांना वाटू लागली आहे. तसेच बनावट कागदपत्रांचा वापर करुन ही घरं बनवली असल्यामुळे आता पालिका या इमारतींवर कारवाई करणार का हा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

अशावेळी मुलाबाळांचं काय करायचं, संसराचं काय करायचं हा मोठा प्रश्न या कुटुंबियांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे या कुटुंबियांच्या भविष्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आल्याचं म्हटलं जात आहे.  विरारच्या सहकार नगर येथील जीवदानी दर्शन अपार्टमेंट, श्री गुरु कृपा अपार्टमेंट येथील नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न सध्या गंभीर झाला आहे. त्यामुळे यावर आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

<a href="https://ift.tt/OwkGoFg Virar News : वसई विरारमध्ये घर घेताय तर मग वेळीच व्हा सावधान, बनावट शिक्के आणि लेटरहेड बनवणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

source https://marathi.abplive.com/news/mumbai/vasai-virar-maharashtra-people-are-in-worried-after-police-arrested-duplicate-stamp-and-document-gang-detail-marathi-news-1199538

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.