30 सप्टेंबरपर्यंत स्वीकारणार दोन हजारांच्या नोटा, त्यानंतर मात्र नोटांना 'नो एन्ट्री' शिर्डी संस्थानचे सबुरीचं धोरण
रिझर्व्ह बँकेच्या दोन हजारांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर, असंख्य भाविकांची श्रद्धा असलेल्या साईबाबांच्या शिर्डी संस्थाननेसबुरीचं धोरण अवलंबलं आहे. 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू नका असं आवाहन आतापासूनच शिर्डी संस्थानच्या वतीने भाविकांना करण्यात येत आहे. साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी सिवा शंकर यांनी हे आवाहन केलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत साईंच्या दानपेटीत दोन हजारांच्या नोटा स्वीकारण्यात येतील मागील नोटबंदीच्या काळातील नोटा पडून असल्यानं साई संस्थानने हा निर्णय घेतला असल्यांचं सांगितलं जात आहे. शिर्डी संस्थानात दररोज लाखो रुपयांचं दान येत असतं. भाविक मोठ्या प्रमाणात शिर्डी संस्थानात दान करत असतात. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.मागील नोटबंदीच्या अनुभवावरुन आताचा निर्णय मोदी सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्यानंतर शिर्डी संस्थानमध्ये या नोटा भाविकांनी दान केल्या होत्या. अनेक भक्तांनी दानपेटीत या नोटा टाकल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिर्डी संस्थानच्या दानपेटीत या नोटा जमा झाल्या होत्या. नोटबंदीच्या काळात जवळपास 3 कोटी रुपयांच्या नोटा साईंच्या दानपेटीत जमा झाल्या होत्या. या नोटा आजही तशाच पडून आहेत. त्यामुळे पुन्हा तशी वेळ येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं शिर्डी संस्थानकडून सांगितलं जात आहे. गुलाबी नोटांचा प्रवास लवकरच संपणार रिझर्व्ह बँकेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार 30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटा चलनातून बाद होणार आहे. या नोटांची कायदेशीर अवैध्य असणार असल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. तसेच या गुलाबी नोटांनी केवळ साडे सहा वर्षांचा प्रवास केला असून आता या नोटा रद्द करण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे. 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्यानंतर 2000 च्या नोटा चलनात आल्या होत्या. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात या नोटा चलनात होत्या. त्यावेळी त्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात होता. परंतु कोरोनाच्या काळानंतर अर्थव्यवस्था पुन्हा जम बसवत होती. परंतु त्यावेळेस दोन हजाराच्या नोटा मात्र गायब होऊ लागल्या होत्या. . तसेच मागील तीन वर्षांपासून एकही दोन हजारांची नोट छापण्यात आली नाही आहे. सर्वसामान्य लोकांना मात्र या नोटांचा बऱ्यापैकी त्रास व्हायचा, कारण 500 नंतर थेट 2000 च्या नोटा चलनात होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: