14th June In History: जगतक रकतदत दन रज ठकर यच वढदवस अभनत सशत सह रजपत यच नधन; आज इतहसत

14th June In History: जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आजचा दिवस सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. आज जागतिक रक्तदाता दिन आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज जन्मदिन आहे. तर, बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं निधन आजच्या दिवशी झालं. यासह आजच्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी पाहूया 14 जूनचे दिनविशेष.

जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day)

14 जून हा ABO रक्तगट प्रणालीचा शोध घेणारे शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँडस्टेनर यांचा जन्म दिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो. जागतिक रक्तदाता दिनाचे उद्दिष्ट सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे हा आहे. हा दिवस ऐच्छिक रक्तदात्यांनी त्यांचे किमती रक्तदान केल्याने त्यांचे आभार मानण्याचा एक प्रसंग असतो.

1967: आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा जन्मदिन

प्रसिद्ध भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा आज जन्मदिन आहे. कुमार मंगलम बिर्ला हे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादचे कुलपती देखील आहेत. बिर्ला यांनी त्यांचे वडील आदित्य विक्रम बिर्ला यांच्या निधनानंतर 1995 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांच्या कारकिर्दीत बिर्ला ग्रुपने बराच नफा कमावला.

1968 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन

आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आज 55 वा वाढदिवस आहे. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि अध्यक्ष आहेत. ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले, ते अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना आपले आदर्श मानतात. राज ठाकरेंची तरुणांमध्ये फार लोकप्रियता आहे. विशेषतः त्यांची भाषणं ऐकण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच नेर्तृत्व आणि वक्तृत्व गुण राज ठाकरेंकडे असल्याने त्यांच्यानंतर शिवसेनेचे सूत्र राज ठाकरेंकडेच येणार असे बऱ्याच जणांना वाटायचे. परंतु, बाळासाहेबांनी कार्याध्यक्षपदाची सूत्र उध्दव ठाकरेंकडे सोपवल्याने राज समर्थक मोठ्या प्रमाणात दुखावले गेले, अखेरीस वैमनस्य वाढत गेले आणि राज ठाकरे आपल्या समर्थकांसमवेत शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर राज ठाकरेंनी 9 मार्च 2006 रोजी मनसे या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

2020: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं निधन

बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला जाऊन आज तीन वर्ष झाली, पण अजूनही त्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. त्याच्या आईचा तो लाडका होताच, पण त्याच्या चाहत्यांचं देखील त्याच्यावर प्रचंड प्रेम होतं. त्याच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात आजही पाणी येतं. त्याचे चाहते त्याच्या मृत्यूनंतर आतापर्यंत रोज त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन सुशांतच्या आठवणींना उजाळा देतात. सुशांतला चार बहिणी आहेत आणि त्या चौघींचाही तो लाडका होता, त्याची मोठी बहीण श्वेता सिंह आजही सुशांतच्या आठवणीत मग्न असते आणि ती त्याच्यासोबतचे फोटोही नेहमी शेअर करत असते. सुशांत अभ्यासात फार हुशार होता. परंतु, अभिनेता बनण्याच्या स्वप्नासोबत तो सर्व सोडून मुंबईत आला. त्याला ग्रहांचा अभ्यास करणं पार आवडायचं, त्यासाठी त्याने विशिष्ट टलिस्कोप देखील खरेदी केला होता. त्याच बरोबर तो समाजसेवेत फार सक्रिय होता. एम. एस. धोनी, केदारनाथ, शुद्ध देसी रोमान्स, काय पो चे, छिछोरे, दिल बेच्चारा यासह बरेच हिट सिनेमे सुशांतने केले आहेत. पवित्र रिश्ता या सिरीअलमधून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि तो घराघरात पोहोचला, त्याच्या स्वभावाने प्रत्येकाचे मन त्याने जिंकून घेतले.

इतर महत्त्वाच्या घटना:

1896 : महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.

1916 : माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी दिवान प्रेम चंद यांचा जन्मदिन.

1946 : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा जन्मदिन.

1955 : सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अभिनेत्री, गायक, मनोरंजन निर्माता, टीव्ही टॉक शो होस्ट आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या किरण अनुपम खेर यांचा जन्मदिन.

1967 : चीनने पहिल्या ’हायड्रोजन बॉम्ब’ ची चाचणी केली.

2011 : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रुद्र्विणा वादक भारतीय संगीतकार असद अली खान यांचे निधन.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/14th-june-in-history-on-this-day-sushant-singh-rajput-death-anniversay-raj-thackeray-birthday-world-blood-donor-day-1184032

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.