Maharashtra Politics : शवसनकडन कलचय जहरतत दरसत आजचय जहरतत फडणवस अन बळसहबच फट लकपरयतच टककवरह बरज करन सदर

Maharashtra Politics :  शिवसेनेनं (Shiv Sena News) सोमवारी सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे (Shiv Sena Advertisement) राजकारण (Maharashtra Politics) तापलं होतं. त्यातच आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), या दोघांचा फोटो आहे. तसंच, वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), आनंद दिघे (Anand Dighe), नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांचे फोटो दिसत आहेत.

कालच्या जाहिरातीत केवळ मोदी आणि शिंदे यांचेच फोटो होते. त्यावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली होती. आनंदाच्या क्षणी शिंदे हे बाळासाहेबांना विसरले, अशी टीका ठाकरे गटानं केली होती. तसेच, या जाहिरातींमुळे भाजपच्या गोटातही नाराजी आणि अस्वस्थता पसरल्याचं समजतंय. या सगळ्यावर फुंकर म्हणून शिवसेनेनं आज पुन्हा जाहिरात दिली असं बोललं जातं आहे. आजच्या जाहिरातीत फडणवीसांचा फोटो आहे, मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोटो मात्र गायब आहे. तसेच, भाजप नेत्यांचेही फोटो आजच्या जाहिरातीत नाहीत, यावरुन आज पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काल शिवसेनेकडून (शिंदे गट) महाराष्ट्रातील जवळपास सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची ही जाहिरात होती. तसेच, या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची शिंदेना तर 23.2 टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्ले जाहीरातीत करण्यात आला होता. त्यामुळे भाजपमधून नाराजीचा सूर आवळला होता. आज अखेर शिवसेनेकडून याप्रकरणी सारवासारव करुन दुसरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जाहिरातीवरुन शिंदे गटाचा सामनातून खरपूस समाचार

शिवसेनेनं काल सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून सामन्यातून खरपूस टीका करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरेंबाबत शिंदेंचं प्रेम हे केवळ ढोंग आहे, असे ताशेरे सामनाच्या अग्रलेखात ओढण्यात आले आहेत. राष्ट्रात 2024 नंतर मोदींचे राज्य राहणार नाही, आणि महाराष्ट्रातही सत्तापालट होईल, असा दावाही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे'; शिवसेनेकडून जाहिरात; फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे लोकप्रिय असल्याचा उल्लेख

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-politics-updates-correction-in-yesterday-advertisement-by-shiv-sena-devendra-fadnavis-balasaheb-thackeray-photos-in-today-ad-popularity-percentage-also-added-up-cm-eknath-shinde-bjp-pm-modi-1184048

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.