Pune : अनिल रामोड यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत CBI कडून तपास, सहा कोटींच्या रोकडसह कागदपत्रे जप्त

Pune CBI Raid: पुणे (Pune) विभागाचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड (Anil ramod) यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने (cbi) रंगेहाथ पकडले आहे. अनिल रामोड यांच्या तीन घरी रात्री उशिरापर्यंत सीबीआय ची पथके तपास करत होती. या तपासात आय ए एस अधिकारी असलेल्या रामोडोच्या घरी तब्बल सहा कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. आज रामोड यांना शिवाजीनगर, पुणे (महाराष्ट्र) येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त

अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग (NHAI साठी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचे लवाद) यांच्याविरुद्ध तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील तीन ठिकाणी अनिल रामोड यांच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली. त्यामध्ये सहा कोटी रुपये सापडले आहेत. तसेच स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेल्या 14 स्थावर मालमत्तांसह मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे,  गुंतवणूक आणि बँक खात्यांचे तपशीलासह इतर दस्तऐवजही जप्त करण्यात आला आहे.

जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखो रुपयांची लाच

दरम्यान, आज (१० जून २०२३) अनिल रामोडला सीबीआय कडून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अनिल रामोडकडे वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी भूसंपादन करण्याची आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी होती. पण रामोड शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखो रुपयांची लाच मागत असे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका  शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी रामोडने 10 लाख रुपयांची लाच मागितली होती. ती स्विकारताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.  त्यानंतर रामोडचे पुण्यातील शासकीय निवासस्थान, बाणेर भागातील रुतुपर्ण सोसायटीतील फ्लॅट आणि नांदेड इथल्या घरी सीबीआय कडून शुक्रवारी दिवसभर छापेमारी करण्यात आली. यामध्ये रोक रखमेसह महत्वाची कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. रामोड यांना 8 लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने पकडले. सीबीआयने या संदर्भात सापळा रचला होता. रामोड हे आयएएस अधिकारी असून महसूल विभागात ते उपयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर छापेमारी झाल्याने विभागीय आयुक्त कार्यलयात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/8CFtTWL CBI Raid: अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर CBI ची छापेमारी; 8 लाख रुपये स्वीकारताना CBI ने गाठलं

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pune-cbi-raid-cbi-raid-on-additional-divisional-commissioner-anil-ramod-in-pune-1182942

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.