Uniform Civil Code : समन नगर कयदयवरन वरधकमधयच फट? परकरण कय? ABP Majha

<p>आम आदमी पक्षानं समान नागरी कायद्याचं समर्थन केलं आहे. मात्र, सर्व धर्मांशी चर्चा करून सहमतीनंच हा कायदा करण्यात यावा, असं आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संदीप पाठक म्हणाले. समान नागरी कायद्याचं आम्ही तत्वतः समर्थन करतो, हा कायदा असावा असं घटनेच्या कलम ४४मध्ये देखील लिहिलंय. मात्र सर्व धर्मियांची याला संमती हवी, अशी आपची भूमिका आहे. दरम्यान समान नागरी कायदा आणणे हा राजकीय डाव असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणालेत, तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समान नागरी कायदा आणण्याचा प्रकार आहे, असंही ते म्हणालेत.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-aap-arvind-kejriwal-supports-uniform-civil-code-maharashtra-news-1188121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.