Ajit Pawar : अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री... अमोल मिटकरींचे ट्वीट व्हायरल अन् शिंदे गटातील आमदारांच्या पोटात गोळा

Amol Mitkari Tweet On <a href="https://ift.tt/ctCYQga Pawar : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनपेक्षितपणे सामील झालेल्या अजित पवार गटामुळे आधीच शिंदे गटाचे आमदारांमध्ये चलबिचलता सुरू आहे, अशात आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींच्या एका ट्वीटमुळे त्यांच्या चिंतेत अधिकची भर पडल्याचं चित्र आहे. अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, राज्यात लवकरच अजित पर्व सुरू होईल असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये गेले असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री असतील असं सांगितल्याने उलट सुलट राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अजित पवारांची राजकारणात काम करण्याची स्टाईल, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची कार्यशैली त्यातून दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ शेअर करत अमोल मिटकरी यांनी राज्यात लवकरच अजित पर्व सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे. 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असं कॅप्शन त्यांनी त्या ट्वीटला दिलं आहे.

अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी शिंदे- भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा अमोल मिटकरी हे अजित पवारांसोबत गेले. त्यानंतर अजित पवारांनी त्यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नेमलं. त्यामुळे अमोल मिटकरी यांच्या या ट्वीटवर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या एका गटाला सोबत घेऊन 2 जुलै रोजी शिंदे- भाजप सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि नऊ महत्त्वाची मंत्रिपदं पदरात पाडून घेतली. राज्याचे अर्थमंत्रीपदही स्वतःकडे घेतलं. या सर्वामध्ये शिंदे गटाला अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा होती. अजित पवार गटाला नऊ कॅबिनेट मंत्रिपदं गेल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत होते, पण नंतर आलेल्या अजित पवार गटाला मंत्रिपदं देण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/XcGzNxu Mundhe : तुकाराम मुंढे यांची महिन्याभरात पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्यात बदली; वाचा राज्यातील 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncp-amol-mitkari-tweet-on-ajit-pawar-cm-of-maharashtra-shivsena-eknath-shinde-group-marathi-news-1194501

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.