राज्यभर आज मुसळधार, पुण्याला रेड अलर्ट तर मुंबईला ऑरेंज अलर्ट, पाहा पावसाचा अंदाज

Rain Update In Maharashtra In Marathi  : मागील काही दिवसांपासून राज्यात धुवांधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेत तर काही ठिकाणी धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. आजही  राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज कुठे कसा पाऊस, पाहा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

कोकण :

पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी म्हणजेच 204 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. पालघरला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

ठाण्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, ज्यात ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत पावसाचा इशारा आहे. ठाण्याला ऑरेंज  अलर्ट देण्यात आलाय.

मुंबईत काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत पाऊस होऊ शकेल - आॅरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे. घाट माथ्यावर १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे.

रत्नागिरी - काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ज्यात ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत पाऊस होऊ शकेल. हवामान विभागान ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे.

सिंधुदुर्ग - काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा - यलो अलर्ट

मध्य महाराष्ट्र :

पुणे - घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात २०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे. पुण्याला हवामान विभागाने  रेड अलर्ट जारी केला आहे.

साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  ६४ मिमी ते २०० मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे.

भीमाशंकर, लोणावळा, खंडाळा, कसारा, इगतपुरी, अंधारबन, ताम्हिणी, कुंडेलिका, भोर  या घाट परिसराच पावसाची शक्यता.
महत्त्वाचे :

संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी सावधगिरीचा इशारा वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दरडी कोसळ्याची शक्यता  आहे. विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात फ्लॅश फ्लडचा अंदाज  आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mumbai-rain-news-live-updates-the-city-is-likely-to-receive-heavy-rainfall-during-the-next-2-days-says-imd-1194513

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.