Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस, वाहतुकीवर परिणाम; आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथढी भरुन वाहत आहेत. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होत आहे. तर चांगल्या पावसामुळं बळीराजा समाधानी झाला. या पावसामुळं आता शेती कामांना वेग येणार आहे. दरम्यान, राज्यात कोकणासह मुंबई उपनगर ठाणे परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही पावसानं जोरदार बँटिंग केली आहे. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्या तआला आहे. कोकणातील रत्नागिरी, पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यासह पुण्यात देखील पावसाचा आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे परिसरातही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस

यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. असून हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून बहुतांश रस्ते वाहतुकीस बंद आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास शालेय विद्यार्थ्यांना घरी जाण्यास अडथळा निर्माण होवू नये. तसेच कोणताही अनूचित प्रकार होवू नये याकरिता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांसह महाविद्यालयांना आज ( 22 जुलै) सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस

नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. गेल्या आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने नाशिकच्या मालेगावमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पोलीस कवायत मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून पाण्याचे तळे निर्माण झाले होते. मुलांनी पावसाने साचलेल्या पाण्यातच खेळण्याचा आनंद लुटला. तर काही नागरिकांना अचानक पाणी सवचल्याने गुडघाभर पाण्यातून आपली मोटरसायकल काढण्यासाठी कसरत करण्याची वेळ आली.

वर्ध्यासह अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस

वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसामुळे धरण क्षेत्रात पाणी वाढले आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पाची जलपातळी वाढल्यानं धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. 300 घन मीटर प्रति सेकंद प्रमाणे ऊर्ध्व वर्धा धरणात विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वर्ध्यातील निम्न वर्धा प्रकल्पावर देखील होणार आहे.

लातूरमध्ये तीन दिवसापासून सूर्यदर्शन नाही, सर्वत्र पाऊस

मागील तीन दिवसापासून लातूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. तीन दिवसापासून सूर्यदर्शन झालेच नाही. ढगाळ वातावरण जरी असलं आणि रिमझिम पाऊस जरी पडत असला तरीही मोठा पाऊस अद्याप झाला नव्हता. मात्र, काल रात्री आणि आज सकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केलेली पाहायला मिळत आहे. लातूर शहर आणि परिसरातील निलंगा औराद शहाजानी लामजना आणि जळकोट या भागामध्ये रात्री जोरदार पावसाची हजेरी लावली होती.

विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग

भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. सुरुवातील ओढ दिल्यानंतर आता दमदार पाऊस झाला आहे. हवामान विभागानं भंडारा जिल्ह्यात काल ऑरेंज अलर्ट घोषित असताना हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तर, आज येलो अलर्ट आहे.

मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस

मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या तीन दिवसापासून ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या संततधारेमुळे शहरात पाणी तुंबण्याच्या ठिकाणामध्ये दरवर्षीच्या तुलनेत घट झाली असली तरी, शहरातील वागळे इस्टेट एम.आय.डीसी परिसरातील रस्त्यांवर मात्र मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसुन येत आहे. औद्योगिक वसाहत असलेल्या या भागात हजारो चाकरमानी नोकरी धंद्यानिमित येत असतात, त्यांना या खड्डयाचा मनस्ताप सोसावा लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/ObRUwxK : लातुरात पावसाची सर्वत्र हजेरी, तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही, जळकोट आणि निलंगा परिसरात जोरदार पाऊस

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-newsheavy-rains-in-various-parts-of-the-state-1194520
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-newsheavy-rains-in-various-parts-of-the-state-1194520
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: