7th August Headline: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आज पुण्यात, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, आज दिवसभरात

7th August Headline: आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आज सुरुवात होणार आहे. अधिवेशनाचा शेवटचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पुण्यात असणार आहेत. चार वेळा रद्द झालेला जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रम आज पार पडणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. मणिपूर हिंसाचार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी देखील होणार आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेत अमित शाह सादर करणार आहेत, यावर दुपारी 2 वाजल्यापासून चर्चेला सुरूवात होईल. अविश्वास प्रस्ताव, दिल्ली सेवा विधेयकामुळे पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी सकाळी 10 वाजता संसदेत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. तर भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टीने आपल्या राज्यसभेतील सदस्यांसाठी आठवडाभरासाठी व्हीप जारी केला आहे.

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा पाचवा दिवस

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. 3 ऑगस्टपासून सुरू असलेल्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. सोमवार असल्यामुळे बसअभावी नोकरदारांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरू आहे. त्यामुळे प्रशासन या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे कधी लक्ष देणार आणि मुंबईकरांना होणारा त्रास कधी संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आज पुण्यात

जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रम हा चार वेळा रद्द झालेला कार्यक्रम आज पार पडणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज पुण्यात असतील. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आधी जेजुरी गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेणार आहेत, त्यानंतर दुपारी 1 वाजता जेजुरीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे.

मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

आज मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, यासाठी न्यायालयाने राज्याच्या डीजीपींना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितलं आहे. न्यायालयाने राज्य सरकारला सुमारे 6,500 एफआयआरचं वर्गीकरण करून चार्ट तयार करण्यास सांगितलं आहे. खून, बलात्कार, दरोडा, महिलांशी गैरवर्तन, धार्मिक स्थळांचं नुकसान अशा गंभीर प्रकरणांशी संबंधित किती एफआयआर आहेत, हे सांगण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची समिती स्थापन केली जाऊ शकते, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. सकाळी 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे.

आजच्या सुनावणी कोणत्या ?

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्याकरता ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं संजय आणि प्रवीण राऊत यांना दिलेला जामीन अयोग्य असल्यानं तो रद्द करावा अशी ईडीची मागणी. आज ईडीचा युक्तिवाद संपण्याची शक्यात. प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊतांपर्यंत काळापैसा पोहचल्याचा ईडीचा दावा.

शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा आणि महेश राऊत यांनी त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याकरता हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी बँकेविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. बँकेची कारवाई चुकीची असल्याचा कोचर यांचा दावा. ईडी आणि सीबीआय तपासकरत असलेल्या प्रकरणी चंदा कोचर सध्या जामीनावर बाहेर.

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या फौजदारी कारवाईमुळे परदेशात जायला मिळत नसल्याचा दावा करत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. नरेश गोयल यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यास तपासयंत्रणेचा जोरदार विरोध.

पत्रकार जेडे हत्याकांड प्रकरणी डॉन छोटा राजनसह अन्य आरोपींनी त्यांना झालेल्या शिक्षेविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं छोटा राजनसह 8 आरोपींना सुनावलीय याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/7th-august-headline-today-top-news-devendra-fadanvis-eknath-shidne-ajit-pawar-pune-marathi-news-1198988
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/7th-august-headline-today-top-news-devendra-fadanvis-eknath-shidne-ajit-pawar-pune-marathi-news-1198988
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: