फोंडा-पणजी महामार्गावर भरधाव मर्सिडीजमुळे भीषण अपघात, तिघांनी गमावले प्राण, तर सातजण गंभीर जखमी

Maharashtra Goa Accident News: फोंडा-पणजी महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ (Banastari Bridge) रविवारी रात्री भीषण अपघात (Accident News) झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून सातजण जखमी झाले आहेत. अपघातातील सात जखमींना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विचित्र अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मर्सिडीज कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

फोंडा-पणजी महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ रात्री 9 वाजता झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जागीच ठार झाले असून सातजण जखमी झाले आहेत. फोंड्याहून भरधाव वेगानं येणाऱ्या मर्सिडीज गाडीनं सुरवातील तीन दुचाक्या आणि नंतर तीन चारचाकी गाड्यांना ठोकल्यानं हा विचित्र अपघात झाला.

बाणास्तरी पुलावर झालेल्या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज कारच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. मार्दोळ पोलिसांनी या चालकाला अटक केली आहे. परेश ए. सिनाई सावर्डेकर असं चालकाचं नाव आहे.

वाणस्तारी पुलाजवळील अपघातात दिवाडी येथील दुचाकीस्वार सुरेश फडते, भावना फडते आणि अनुप कर्माकर हे जागीच ठार झाले आहेत. या अपघातातील सात जखमींना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. चारचाकीनं जोरदार ठोकर दिल्यानं दुचाकीवरील भावना फडते उडून पुलाच्या खाली पडल्यानं त्या जागीच ठार झाल्या.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज गाडीनं सुरुवातीला बाणस्तारी पुलाजवळ थांबलेल्या दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यानंतर चुकीच्या वनवेत घुसून इतर तीन चारचाकी गाड्यांना जोरदार धडक दिली.

नेमका कसा झाला अपघात?

फोंडा-पणजी महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ रात्री 9 वाजता एका भरधाव मर्सिडीज कारमुळे भीषण अपघात झाला. या विचित्र अपघातात तिघांनी आपले प्राण गमावले, तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज गाडीनं सुरुवातीला बाणस्तारी पुलाजवळ थांबलेल्या दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यानंतर चुकीच्या वनवेत घुसून इतर तीन चारचाकी गाड्यांना जोरदार धडक दिली.

मर्सिडीज गाडीनं तीन दुचाक्यांना धडक दिली, त्यानंतर दोन आल्टो आणि स्विफ्ट गाडीला धडक दिली. त्यानंतर मर्सिडीज गाडी थेट दुभाजकाला धडकली आणि स्थिरावली. या काळातही चालकाला अपघात घडला याचं भान नव्हतं. त्यामुळेच पाच, सहा गाड्यांना मर्सिडीज चालकानं ठोकलं. पोलिसांनी चालकाला अटक केली असून चौकशी सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आक्षेपार्ह स्टेटसवरुन बीडच्या आडस गावात दोन गटात राडा, पोलिसांकडून शांततेचे आवाहन

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/goa-banastarim-bridge-accident-by-mercedes-car-on-ponda-panajim-highway-three-people-lost-their-lives-and-seven-were-seriously-injured-accident-news-1199066

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.