Majha Sanman 2023 : चहुबाजूने पसरलेल्या निराशेच्या गर्तेत आशेचा किरण म्हणजे 'एबीपी माझा'चे कार्य: राज ठाकरे

<a href="https://ift.tt/d5Vyk2W Majha Sanman 2023 : महाराष्ट्र ही कार्यकर्ते निर्माण करणाऱ्या संस्थांचे मोहोळ आहे असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं, एबीपी माझाच्या पुरस्कार सोहळ्याकडे पाहता त्याची प्रचीती येते असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. चहूबाजूने असलेल्या निराशेच्या गर्तेत ज्यावेळी आशेचे किरण दिसतात त्यावेळी काम करण्याची प्रेरणा मिळते, एबीपी माझा हे त्यापैकीच एक आहे असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या यंदाच्या 'माझा सन्मान' पुरस्कारांचे (Majha Sanman 2023) वितरण झालं. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, डॉ. श्री ठाणेदार, अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांच्यासह दहा जणांना यावेळी गौरवण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे बोलत होते.

जितेंद्र कपूर हे आवडते अभिनेते

जितेंद्र कपूर हे माझे आणि माझ्या आईचे आवडते अभिनेते असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, जितेंद्र कपूर यांच्या फिटनेसचं रहस्य काय असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की गेल्या 45 वर्षांमध्ये त्यांनी पाव, भात कधीही खाल्ला नसल्याचं सांगितलं. गेल्या 45 वर्षात त्यांनी फक्त चिकन तंदुरी आणि फ्रेश फ्रुट सॅलड खाल्ल्याचं सांगितलं. हाच किस्सा मी माझ्या मित्रांना पिझ्झा खाताना सांगितला.

अमेरिकेच्या संसदेत ठाणेदार बसले आहेत, महाराष्ट्राच्या विधानसभेत ठाणेकर बसले आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची अशी एकदा वेळ येईल भविष्यात असं राज ठाकरे यांनी म्हणताच सर्वजण हास्यात बुडाले.

माझा सन्मान पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केल्याबद्दल राज ठाकरे यांनी एबीपी माझा आणि संपादक राजीव खांडेकर यांचे आभार मानले. चहुबाजूने असलेल्या या निराशेच्या गर्तेत ज्यावेळी आशेचा किरण दिसतात त्यावेळी काम करावं वाटतं, अनेक तरुण-तरुणींना ही माणसं पाहिल्यानंतर जेव्हा काम करण्याची प्रेरणा मिळते, त्या प्रेरणेला ज्यावेळी व्यासपीठ मिळते त्यावेळी ती महाराष्ट्रभर पसरते असं ते म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले की, महात्मा गांधी सांगत असत की महाराष्ट्र हे कार्यकर्ते निर्माण करणाऱ्या संस्थांचे मोहोळ आहे. आजही त्याची प्रचीती येते. आजही महाराष्ट्र एक नंबरला आहे. अशा प्रकारचं काम हे महाराष्ट्रात होतं, यापुढेही होत राहिल.

सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना 'माझा सन्मान' बहाल करण्यात आला. ज्यांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवला, महाराष्ट्रासह देश आणि परदेशातही ज्यांच्या कार्याची दखल घेतली अशा गुणीजनांना 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

या दिग्गजांचा झाला सन्मान

श्री ठाणेदार - अमेरिकेतील पाहिले मराठी खासदार

शार्दुल ठाकूर, क्रिकेटर

श्रद्धा कपूर, अभिनेत्री

सुरेश वाघे, साहित्यिक-संशोधक

सत्यपाल महाराज, कीर्तनकार

वारे गुरुजी, शैक्षणिक

सुरेश वाडकर, संगीत

अशोक पत्की, संगीत

केदार शिंदे, नाटक-सिनेमा

अशोक जैन, उद्योजक जैन समूह

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/xAmRVfK Sanman 2023 : सुरेश वाडकर, श्रद्धा कपूर, शार्दूल ठाकूर यांच्यासह दहा जणांचा 'माझा सन्मान' पुरस्काराने गौरव

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mns-raj-thackeray-abp-majha-sanman-puraskar-speech-2023-marathi-news-1204504
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mns-raj-thackeray-abp-majha-sanman-puraskar-speech-2023-marathi-news-1204504
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: