Mumbai Crime: वृद्ध पतीचा पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला; कांदिवली पूर्वेतील घटनेने परिसरात खळबळ

मुंबई: मुंबईच्या कांदिवली (Kandivali) पूर्व परिसरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका कुटुंबातील 79 वर्षीय व्यक्तीने नैराश्यातून आणि वयोमानानुसार जडलेल्या विविध आजारांना कंटाळून आपल्या 76 वर्षीय पत्नीवर खुनी हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर त्या वृद्धाने स्वतःवरही हल्ला केला आहे. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

वृद्धापकाळाने ग्रासल्यामुळे केला संपवण्याचा प्रयत्न

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरातील मर्क्युरी रेसिडेन्सी इमारतीत विष्णुकांत बलूर (79) आणि त्यांची पत्नी शकुंतला बलूर (76) हे वृद्ध जोडपे राहत आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये कामानिमित्त वास्तव्यास आहे. विष्णुकांत 40 वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आहेत. वयोमानानुसार या जोडप्याला विविध आजारांनी ग्रासले आहे, यातूनच नैराश्य आल्याने विष्णुकांत बलूर यांनी आपल्या पत्नीच्या डोक्यावर चाकूने वार करून गळा कापण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही हल्ला करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं असून आता दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं समजतं आहे.

भंडारा जिल्ह्यातही घडला होता असाच काहीसा प्रकार

आपल्या तीन वर्षीय चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न एका मद्यपी वडिलांनी केला आहे. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी चिमुकल्याच्या वडिलांना बेड्या ठोकल्या. आईच्या मांडीवर खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्या मुलाला मद्यपी बापानं ओढत नेत त्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली या गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायधने याला अटक केली.

विरली येथील राजेंद्र गायधने याला मद्यप्राशनाची सवय असल्याने नेहमी प्रमाणे तो मद्य प्राशन करून घरी पोहोचला होता. यावेळी त्याचा चिमुकला तीन वर्षीय मुलगा अथर्व हा आईच्या मांडीवर बसलेला होता. त्यावेळी मद्यपी बापानं त्याला आईकडून जबरदस्तीनं हिसकावून अंगणातील जमिनीवर आपटलं, यात चिमुकला गंभीर जखमी झाला. यानंतर आईनं गंभीर जखमी बालकाला मद्यपी बापाच्या तावडीतून सोडवलं आणि उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्यानं पुढील उपचारासाठी बाळाला भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. लाखांदूर पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/0Yn1cpg Mumbai: घरी सीबीआयची छापेमारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संपवलं जीवन; सीबीआय चौकशीला कंटाळून कस्टमच्या अधिकाऱ्याची आत्महत्या

source https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-crime-elderly-husband-attacks-wife-with-sharp-weapon-case-has-been-registered-1204498

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.